मराठी मध्ये लग्नाचा बायोडाटा म्हणजेच विवाह बायोडाटा नमुना, स्वरूप किंवा फॉर्म कसा तयार करायचा?

लग्नाचा बायोडाटा मराठी मध्ये कसा तयार करायचा? हा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? हो असेल तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

या पोस्ट मध्ये आपण लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट म्हणजेच विवाह बायोडाटा स्वरूप किंवा फॉरमॅट कसा तयार करायचा हे शिकणार आहोत.

हे वाचल्यानंतर तुम्ही सहजपणे मराठी मध्ये लग्नाचा/विवाह बायोडाटा बनवू शकता तेही फक्त 5 मिनिटांत.

मुलाचा बायोडाटा किंवा मुलीचा बायोडाटा बनवला जातो तेव्हा दोन्ही बायोडाटा मधील माहिती मध्ये थोडासा फरक असतो तो ही आपण जाणून घेणार आहोत.

माझे नाव शुभम आहे गेली 5 वर्ष मी मराठी मध्ये विवाह बायोडाटा बनवून देण्याचे काम करीत आहे आजपर्यंत जवळ जवळ 473 लग्नाचे बायोडाटा बनवून दिलेले आहेत. मला आजपर्यंत मिळालेले सर्व ज्ञान आपणास सांगणार आहे.

मराठी मध्ये लग्नाचा बायोडाटा म्हणजेच विवाह बायोडाटा नमुना, स्वरूप किंवा फॉर्म कसा तयार करायचा?

आपल्याला माहित आहे की लग्नाचा बायोडाटा आपण मोबाईल वरती किंवा लॅपटॉप वरती खूप प्रकारे बनवू शकतो जसे की,

  1. मराठी बायोडाटा मेकर चा वापर करून
  2. मायक्रोसॉफ्ट वर्ड चा वापर करून
  3. एका कोऱ्या कागदावरती सर्व माहिती लिहून

आजच्या 21 व्या शतकामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा मराठी बायोडाटा मेकर चा वापर करून विवाह बायोडाटा स्वरूप बनवले जाते. कागदावरती माहिती लिहून देण्याची पद्धत जवळजवळ नाहीशी झाली आहे, तरी पण मी आपणास वरील सर्व पद्धतीने बायोडाटा कसा बनवायचा ते सांगणार आहे.

मराठी बायोडाटा मेकर चा वापर करून

मराठी बायोडाटा मेकर ने बायोडाटा बनवायचे खूप सोप्पे आहे. मी आपणास सांगेन त्या स्टेप फॉलो केल्या तर आपण अगदी 5 मिनिटांत लग्नाचा बायोडाटा बनवू शकता.

मराठी बायोडाटा चा वापर करून बायोडाटा बनवण्याची सर्वात प्रथम पायरी म्हणजे बायोडाटा बनवण्यासाठी marathibiodatamaker.com ही वेबसाइट open करणे.

Marathi biodata maker step 1

वेबसाइट open केल्यानंतर आपल्याला फोटो सोबत बायोडाटा बनवायचा आहे की विना फोटो बनवायचा आहे हे ठरवावे लागेल. जर आपल्याला बायोडाटा फोटोसोबत बनवायचा आहे तर फोटोसोबत बटन वरती क्लिक करायचे आहे आणि जर बायोडाटा विना फोटो बनवायचा असेल तर विना फोटो बटन वरती क्लिक केले पाहिजे.

बऱ्यापैकी सर्वजन बायोडाटा हा विना फोटो बनवतात व फोटो हा पाहुण्यांना separate पाठवतात.

तुम्ही पहिल्यांदा फोटो जोडून तयार केला तरी चालेल, जर आपणास फोटो बायोडाटा वरती चांगला दिसला नाही तर तुम्ही पुणे तो काढून टाकू शकता.

Marathi biodata maker step 2

आता आपल्याला आवडलेली डिझाईन निवडायची आहे. आपल्याला जी डिझाईन आवडेल त्या डिझाईन खालील view डिझाईन बटन वरती क्लिक करून डिझाईन customize बटन वरती क्लिक करायचे आहे. customize बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही माहिती भरण्याच्या page वरती जाल.

सर्वात पहिल्यांदा आपल्याला दर्शन होते ते म्हणजे गणपती बाप्पाचे, प्रत्येकाच्या बायोडाटा मध्ये वरती गणपती बाप्पा चा फोटो असावाच व श्री गणेशाय नम: लिहलेले असावेच.

Marathi biodata maker step 3

खाली दिल्याप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पा चा फोटो जोडायचा आहे आणि जर गणपती बाप्पा चा फोटो बदलायचा असेल तर पेन्सिल बटन वरती क्लिक करून गणपती बाप्पा चा फोटो बदलू शकता. तिथे खाली दिल्याप्रमाणे चार पैकी कोणताही गणपती बाप्पा चा फोटो जोडू शकता.

Marathi biodata maker step 4

जर आपल्याला गणपती बाप्पा चा फोटो जोडायचा नसेल डिलीट बटन वरती क्लिक करायचे आहे. माझे तर म्हणणे आहे की प्रत्येकाने गणपती बाप्पा चा फोटो हा वरती जोडलाच पाहिजे. कारण बाप्पा ला शुभ कार्यवेळी स्मरण केलेले शुभ असते.

नंतर बायोडाटा चा येतो तो म्हणजे मुख्य पार्ट त्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीसाठी बायोडाटा बनवायचा आहे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती, कौटुंबिक माहिती व त्याबरोबरच संपर्कासाठी माहिती जोडायची आहे.

Marathi biodata maker step 5

सर्व माहिती भरणे हे काही compulsory नाही, आपल्याला त्यामध्ये पाहिजे तेवढीच माहिती भरायची आहे. जी माहिती आपल्याला माहिती नसेल किंवा जोडायची नसेल तर ती आपल्याला मोकळी सोडायची आहे.

Marathi biodata maker step 6

आपली सर्व माहिती भरून झाली की आपल्याला क्रिएट बायोडाटा बटन वरती क्लिक करायचे आहे.

अभिनंदन आपला एक छान असा बायोडाटा तयार झालेला आहे.

Marathi biodata maker step 7

जर आपली काही माहिती चुकलेली असेल तर आपल्याला एडिट डिटेल्स बटन वरती क्लिक करायचे आहे व माहीतिमद्धे पाहिजे तो बदल करून बायोडाटा तयार करायचा आहे.

आणि जर आपल्याला बायोडाटा ची डिझाईन आवडली नाही तर चेंज डिझाईन बटन वरती क्लिक करून आपण 50 पेक्षा जास्त बायोडाटा च्या स्वरूपांमधून डिझाईन निवडून बायोडाटा ची डिझाईन बदलू शकतो.

आता आपला बायोडाटा संपूर्णपणे तयार झाला आहे असे वाटत आहे मग आता बायोडाटा ची इमेज आणि पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील सर्व स्टेप्स फॉलो करायच्या आहेत व आपण मग बायोडाटा ची पीडीएफ व इमेज डाउनलोड करू शकतो.

Marathi biodata maker step 8

बायोडाटा ची इमेज डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड इमेज बटन वरती क्लिक करा.

बायोडाटा ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पीडीएफ बटन वरती क्लिक करायचे आहे.

अशा प्रकारे मराठी बायोडाटा मेकर चा वापर करून आपण लग्नाचा छान बायोडाटा तयार करू शकतो.

मायक्रोसॉफ्ट वर्ड चा वापर करून

मायक्रोसॉफ्ट वर्ड चा वापर करून बायोडाटा बनवायचा खूप सोप्पे वाटते पण ते सोप्पे नाही जर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर कसे वापरायचे माहिती तसेल तर. म्हणून तर सर्व जण मराठी बायोडाटा मेकर चा वापर करून बायोडाटा बनवतात.

पण मी खाली सांगितल्याप्रमाणे जर सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर आपण सहजपणे मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून बायोडाटा बनवू शकतो व बायोडाटा हा पीडीएफ, वर्ड व इमेज स्वरूपात डाउनलोड करू शकतो.

जर आपल्याकडे पर्सनल कम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर चांगल्या पद्धतीने बायोडाटा बनवू शकता.

जर मोबाईल असेल तर मराठी बायोडाटा मेकर चाच वापर करून बायोडाटा बनवा.

मी मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून बायोडाटा बनवण्यासाठी सध्याचे वर्ड चे लेटेस्ट व्हर्जन वापरले आहे.

Marathi biodata word step 1

सर्वात प्रथम आपण स्टार्ट मेनू वरती क्लिक करून मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर ओपन करायचे आहे.

Marathi biodata word step 2

मायक्रोसॉफ्ट वर्ड open केल्यानंतर बायोडाटा तयार करण्यासाठी आपल्याला एक ब्लॅंक डॉक्युमेंट तयार करणे गरजेचे आहे ते करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये डाव्या बाजूला जे ब्लॅंक डॉक्युमेंट लिहले आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.

Marathi biodata word step 3

आता आपण खालील प्रमाणे बघू शकता तुमचे असे मायक्रोसॉफ्ट वर्ड open झालेले असावे.

Marathi biodata word step 4

बायोडाटा ची सुरवात होते ती हिंदू धर्मामध्ये ज्या देवाची प्रथम पूजा केली जाते अश्या गणपती बाप्पा ची. सर्वांत वरती खाली लिहल्याप्रमाणे श्री गणेशाय नम: लिहावे. आणि जर श्री गणेशाचा फोटो असेल तर उत्तमच व नंतर मुलाची किंवा मुलीची माहिती लिहावी.

Marathi biodata word step 5

खालील प्रमाणे वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती व संपर्कासाठी सर्व माहिती आपल्याला त्यामध्ये भरायची आहे.

Marathi biodata word step 6

सर्व माहिती भरून झाल्यावर आपला बायोडाटा पूर्णपणे तयार झालेला आहे मग आपल्याला त्या फाइल ची वर्ड, पीडीएफ व इमेज डाउनलोड करता येवू शकते.

वर्ड फाइल डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
File > Save

पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
File > Save as > Save as PDF

मी आपणासाठी फ्री मध्ये मराठी बायोडाटा वर्ड फाइल व मराठी बायोडाटा पीडीएफ डाउनलोड साठी दिलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता व एक छान बायोडाटा बनवू शकता.

एका कोऱ्या कागदावरती सर्व माहिती लिहून

जर आपल्याला एका कोऱ्या कागदा वरती बायोडाटा तयार करायचा आहे तर खालील प्रमाणे तुम्ही एका कोऱ्या कागदावरती माहिती लिहू शकता व एक छान बायोडाटा तयार करू शकता. खाली कागदावरती बायोडाटा चे मराठी स्ट्रक्चर तयार केलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही कागदावरती बायोडाटा बनवू शकता.

Marathi Biodata Structure on Paper

अशा तीन प्रकारे तुम्ही बायोडाटा बनवू शकता.

जर आपणास बायोडाटा बनवताना काही गरज भासली तर आपण आम्हास कॉनटॅक्ट करू शकता. मराठी बायोडाटा मेकर टीम आपल्या मदतीसाठी सदैव हजर आहे.